मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

आज मुंबईकरांना (Mumbai) पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

आज मुंबईकरांना (Mumbai) पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात आज पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. पिसे उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागल्याने आज जलाशयातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. मुंबईमधील काही भागात १०० टक्के तर काही भागात ३० टक्के पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला सोमवारी आग लागली. या लागलेल्या आगीमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय आणि शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी, भंडारवाडा जलाशयातून होणारा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद ठेवला जाणार आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यातून होणार पाणीपुरवठा देखील बंद ठेवला जाणार आहे. तर मुंबईतील उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात केली जाणार आहे.

सोमवारी पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागली. त्यामुळे पिसे जलाशयातून होणार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आई इतर भागात पाणीपुवठा बंद ठेवण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे काही भागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद तर काही भागात ३० टक्के पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. आग लागल्याने उदंचन केंद्रात दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

हे ही वाचा:

लिमिटच्या बाहेर गेलं की काम करतोच; नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Exclusive : Devendra Fadnavis यांना कोणी Disturb केलंय, Manoj Jarange Patil यांनी की BJP MLA नी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version