spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बीएआरसी मधील प्रख्यात माजी शास्त्रज्ञ बेपत्ता…

वान्द्रे (Bandra) परिसरात रहाणारे बीएआरसीमधील निवृत्त, प्रख्यात वयोवृद्ध शास्त्रज्ञ, जे पोखरण अणुचाचणीतील डॉ. अब्दुल कलाम, डॉ. अनील काकोडकर यांच्यासह प्रमुख व्यक्तीपैकी आहेत, ज्यांनी देशकार्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

ही व्यक्ती डिमेंशियाचे रुग्ण असून गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ पासून बेपत्ता आहे. विनायक कोळवणकर (बीएआरसीचे माजी शास्त्रज्ञ) वय वर्ष ७६ असून ते वान्द्रे पूर्व येथील न्यू एमआयजी कॉलनी (New MIG Colony) येथे राहतात. विनायक कोळवणकर यांची पत्नी वैशाली कोळवणकर यांनी या प्रकरणी वान्द्रे निर्मलनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

विनायक कोळवणकर हे ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये  फुले आणण्यासाठी खाली उतरले. त्यांनी घरातून बाहेर पडताना लाईनचा हाफ टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातली होती. तसेच त्यांची उंची साधारण ५.९” च्या आसपास आहे. आज ३ ते ४ दिवस होऊनही ते सापडलेले नाहीत. ते केअरटेकर बरोबर रोज फिरायला जाताना घड्याळ, थोडे पैसे व ओळखपत्र नेत असत, पण बिल्डिंगमध्येच जायचे असल्याने त्यांनी यापैकी काही बरोबर घेतले नव्हते. बेपत्ता झाल्यापासून ठिकठिकाणी या संबंधीची पोस्टरही लावली आहेत.

विनायक कोळवणकर हे डिमेंशियाचे रुग्ण असल्याने बरेचवेळा त्यांना विस्मरणही होत होते. पोलिसांच्या माहितीनुसार विनायक कोळवणकर हे सी.सी टीव्ही फुटेजनुसार वान्द्रे पूर्व येथून वान्द्रे पश्चिम येथे जाताना निदर्शनास आले. त्यामुळे जर ते कुणाला कुठेही आढळल्यास किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास त्वरित कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. (कृपया 9594094095/9869131007 या क्रमांकावर संपर्क साधावा.)

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही; Sanjay Raut यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss