spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेच्या जादा फेऱ्या, पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय

पश्चिम रेल्वेने मंगळवारी दि. १७ सप्टेंबर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना रात्री उशीरादेखील घरी परतताना गैरसोय होणार नाही.

सध्या देशभरात सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुरु आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने मुंबईतही मोठा उत्साह पहायला मिळत आहे. मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी दिसून येते. तर थोड्याच दिवसात अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक अनेक ठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात. याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या रात्री लोकलच्या जास्तीच्या आठ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळाच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन होते. या विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर जुहू चौपाट्यांवर भाविकांची तुफान गर्दी दिसून येते. भाविकांची हीच गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मंगळवारी दि. १७ सप्टेंबर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना रात्री उशीरादेखील घरी परतताना गैरसोय होणार नाही.

चर्चगेटवरून विरारला लोकल १ वाजून १५ मिनिटांनी तर शेवटची लोकल ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल. तर परतीच्या मार्गावरून रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी तर शेवटची लोकल पहाटे ३ वाजता सुटेल. सर्व रेल्वे या चर्नीरोड स्थानकात नेहमीपेक्षा अधिक वेळ थांबतील. जेणेकरून प्रवाशांना चढायला आणि उतरायला अधिक वेळ मिळेल. चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी ५ ते रात्री ८. ३० या वेळेत ३८ जलद अप लोकल सर्व स्थानकावर थांबतील. संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी चर्नी रोड स्थानकावर कोणतीही अप लोकल थांबणार नाही.

लोकलच्या वेळा:

चर्चगेट ते विरार: रात्री १.१५ ,१.५५, २.५५, ३.२०
विरार ते चर्चगेट: रात्री १२.१५, १२.४५, १.४०, ३.००

हे ही वाचा:

Nagpur Hit & Run Case: बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, धक्कादायक माहिती आली समोर

खेतवाडीतल्या बाप्पाचा अनोखा देखावा, गणपती बाप्पाला विनायकी अवतार का घ्यावा लागला..?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss