मुंबईत वाहनं कुठे उभी करायची?; उच्च न्यायालयाने केला राज्य सरकारला सवाल

मुंबईत वाहनं कुठे उभी करायची?; उच्च न्यायालयाने केला राज्य सरकारला सवाल

मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच दिवसेन दिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे या समस्येत अजून वाढ झाली आहे. आता या समस्येवरून थेट उच्च न्यायालयाने राज्यसरकारलाच सवाल केला आहे . वाहनांच्या पार्किंगसाठी काही निश्चित धोरण आहे का?, आणि असेल तर कोणते?, अरूंद रस्त्यांवर राहणाऱ्यांच्या वाहनांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असे सवाल उपस्थित करून त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सोमवारी हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबईत वाहनं कुठे उभी करायची? असे अनेक सवाल विचारात पुढे उच्च न्यायालयाने वाहनतळांसाठी आणि विशेषत: अरूंद रस्त्यांवरील वाहनांसाठी जागा निश्चित करण्याची आवश्यकता आहे असे उच्च न्यायालयाने राज्यसरकारला सांगितल.

मुंबईतील बऱ्याच ठिकाणी अरुंद रस्त्यावरही बेशिस्तपणे गाड्या पार्क केल्या जातात म्हणजेच मुंबईतील टिळक नगर येथील उद्यान गणेश रोड इथं केवळ २० फुटांचा रस्ता आहे या ठिकाणे बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचा प्रकट बहुदा पहिला मिळतो. काही वर्षांपूर्वी टिळक नगर मध्ये एका इमारतीला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाचं वाहनही घटनास्थळी पोहोचू न शकल्यानं आगीत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकारनं पार्कींगचं धोरण निश्चित करावं व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत टिळक नगर नागरीकानी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

टिळक नगरमधील नागरिकांचे यावरम्हणणे आहे की आहे की जिथे २० फूट रॉड आहेत त्या २० फूट रोडमध्ये नो पार्किंग करावं, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.तसेच पार्किंगचा योग्य धोरण ठरवायला हवा आणि तसा निर्णय देखील घ्यायला हव कारण धोरण आल्याशिवाय त्याचे नियमात रूपांतर होत नाही कारण लिओन हे नियमांचे पालन करतात धोरणांचे पालन करत नाही. फक्त दोन लाईनसाठी नो पार्किंग करून याचा उपयोग होणार नाही. तसेच टिळकनगरमधील बहुतांश लोकांकडे गाड्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर पार्किंगसाठी सरकारने काहीतरी उपाय केला पाहिजे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे .

पुण्यातील १९ वर्षीय तरुणाचा सेक्सटॉर्श मुळे बळी : बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

Exit mobile version