सर्व प्रकारचं शिक्षण मराठीतून देण्याचा प्रयत्न करणार; देवेंद्र फडणवीस

आज मुंबईत 'मराठी तितुका मेळावा' या वैष्णव मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

सर्व प्रकारचं शिक्षण मराठीतून देण्याचा प्रयत्न करणार; देवेंद्र फडणवीस

आज मुंबईत ‘मराठी तितुका मेळावा’ या वैष्णव मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन हे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत हते आणि त्यांनी मोलाचे मार्गदर्शन हे केले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी भाषा टिकली पाहिजे, सर्व प्रकारचं शिक्षण मराठीतून देण्याचा प्रयत्न करणार.”

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत कि, मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाऊ देता कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच जे बाहेर गेले आहेत त्यांना देखील आम्ही मुंबईत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं सरकार आल्यानंतर सर्व सॅन हे साजरे करण्यास मोठ्या प्रमाणत सुरुवात झाली. त्यामुळे आपली सण संस्कृती सर्वानी जोपासली पाहिजे असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणले आहेत कि, सर्व पुर्नविकास प्रकल्प हे मार्गी लावली पाहिजे. आणि मराठी भाषेचा आणि विज्ञानाचा जयघोष एकाचवेळी होत आहे. मराठी भाषिकांसाठी काय करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. जी २० अध्यक्षपद मिळालं हे फार मोठं आहे. मराठी माणूस जगभरात आहे ही आनंदाची बाब आहे. मुंबईतला मराठी टक्का घसरू देणार नाही असे देखील एकनाथ शिंदे म्हणले आहेत.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कि, आज जगातील प्रत्येक खंडातील लोक या संमेलनात उपस्थित आहेत. मराठी नाट्य संस्कृतीची प्रगल्भता इतर कशातही पाहता येणार नाही. तसेच ते पुढे म्हणाले, जगातील आयटीमध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे. आम्ही आता इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणदेखील मराठी भाषेतून करणार आहोत. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे.मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावकरांनी केलं. भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केलं पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल आहे.

हे ही वाचा:

रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला झाली सुरुवात

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version