पैसे न देता कॅबने प्रवास करत महिलेची Cab Driver वर दमदाटी

मुंबईतील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. यात मुंबईतील महिलेने कॅब ड्राइव्हरला फसवल्याचे आणि नंतर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे दिसून आले आहे.

पैसे न देता कॅबने प्रवास करत महिलेची Cab Driver वर दमदाटी

मुंबईतील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. यात मुंबईतील महिलेने कॅब ड्राइव्हरला फसवल्याचे आणि नंतर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील गुरगाव मधील हुडा सिटीसेंटर येथे या महिलेने गरिब कॅब ड्राइव्हरकडून काल रात्री १० वाजल्यापासून ते आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवास करून घेतला मात्र त्याला पैसे दिले नाही, हा प्रकार नुकताच समोर आला आहे. कॅब ड्राइव्हरने पोलिसांना तात्काळ बोलावले असता पोलिसांनाही या महिलेने दमदाटी करत धमकावले आहे. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती असे या महिलेचे नाव असून इर्शाद असे कॅब ड्राइव्हरचे नाव आहे. “या महिलेने काल रात्री १० वाजता कॅब भाड्याने घेतली आणि सकाळी ११ वाजेपर्यंत फिरायला लावले पण त्यानंतर २००० रूपये भाडे देण्यास नकार दिला” असे इर्शाद या पिडीत कॅबड्राइव्हरने सांगितले. दरम्यान, या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर इर्शादने पोलिसांना बोलावले. पण ही महिला इथेच थांबली नाही तर हिने पोलिसांवरही रागवत ,ओरडत बोलत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ शूट करणाऱ्या पत्रकारालाही धमकावून बोलत आहे. दिपीका भारद्वाज यांनी आपल्या ट्वीटरवरून (Twitter) हा व्हिडिओ शेअर केला आहे.

“तुम्ही माझा व्हिडिओ बनवत आहात मी पागल आहे का? पोलिसवाले माझा फेक व्हिडिओ बनवत आहेत. ४ वेळा याने ११२ ला कॉल केला. जर तुम्ही मला त्रास दिला तर जे लोक या ठिकाणी उभे आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये यावे लागणार आहे.” असे म्हणत ही महिला पोलिसांना धमकावताना दिसत आहे.”तू कशाला माझा व्हिडिओ बनवतेस माझा व्हिडिओ? पोलिसांनी माझा व्हिडिओ बनवला आहे ना? ही आता माझा व्हिडिओ व्हायरल करणार… तू तुझं काम कर ना, तू मला व्हिडिओ व्हायरल करण्याची कशाला धमकी देतेस?” अशा शब्दांत ही महिला पत्रकाराला बोलताना दिसून आली.

हे ही वाचा:

Parents Day Gift, आपल्या पालकांना द्या या ‘खास’ भेटवस्तू

World Tour, ‘या’ देशांमध्ये आहे व्हिजाशिवाय एन्ट्री!

राज्यसभेत जोरदार घमासान मणिपूर, मणिपूर, मणिपूर…, तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केला सवाल म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version