spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांनो सावधान! तीन दिवसांवर दिवाळी आणि मुंबईतून ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त

मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई दरम्यान मुंबईतून सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. ऐन तीन दिवसांवर दिवाळी आली आहे तर इथे मुंबईतून तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप उत्पादक कारवाई केली आहे.

ही कारवाई मस्जिद बंदर इथे गोदामावर कारवाई करण्यात आली मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला १८ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून २लाख ९९ हजार ९० रुपये किंमतीचा ४०० किलो तूप जप्त करण्यात आला आहे. यासोबतच तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.

दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याचा गैरफायदाही शक्यता असते . यामुळे या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासून किंवा शुद्ध तुपापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नसते. अशातच व्यापारी भेसळयुक्त आणि बनावट पदार्थ ग्राहकांच्या माथी मारण्याचा करत असतात . या वस्तूंमुळे ग्राहकाच्या आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

हेही वाचा : 

मोठी बातमी ! दिवाळी दरम्यान देशात पुन्हा कोरोना पसरणार?, नव्या व्हेरीएंट महाराष्ट्रासह मुंबईची झोप उडणार

‘मशाल’ उद्धव ठाकरेंन सोबतच; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss