मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज सकाळी सकाळी मुंबईच्या लाईफ लाईन या उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, करी रोड स्थानकावर झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून, विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.

आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज सकाळी सकाळी मुंबईच्या लाईफलाईन ही उशिराने धावत होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. करीरोड रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ८. १५ वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी विविध रेल्वेस्थानकांवर दिसून आली. करीरोड रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे हि वाहतूक विस्कळीत झाली आहे. लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

मध्यरेल्वे विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होते . जलद मार्गावर तांत्रिक बिघाड असल्यामुळे सर्व रेल्वे वाहतूक हि विस्कळीत झाली. एक्सप्रेस मेल हि बंद झाली होती आणि त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक हि विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वे रुळांवरून चालत पुढील स्टेशन गाठण्यास सुरुवात केली. गेल्या अर्ध्या तासांपासून सर्व गाड्या या जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे हि विस्कळीत झाली आणि चाकरमान्यांना कामावर पोहचण्यास देखील उशीर झाल्याचे चित्र हे दिसून येत होते. तसेच हि वाहतूक किती वेळात पूर्वपदावर येतील हे सांगण्यात आले नाही.

हे ही वाचा :-

लॅक्टोस इंटॉलरंट आहात? मग हे विगन दुधाचे पर्याय तुमच्याचसाठी आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version