एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? महाजनांच्या प्रश्नाला खडसेंच प्रतिउत्तर

एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? महाजनांच्या प्रश्नाला खडसेंच प्रतिउत्तर

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा इशारा दिलाय. ‘मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे’, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिलाय. गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी आज प्रत्युत्तर दिलं. यावेळी महाजनांनी एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? हे तपासण्याची गरज आहे, असं विधान केलं.

एकनाथ खडसे यांनी या पूर्वी गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होत. यावरून आज गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

या प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन तणावाखाली आहेत, त्यांना काय बोलावं सुचत नाहीये. असं नीच राजकारण मी कधी आयुष्यात केलं नाही. यांचे अनेक उद्योग मला माहिती आहेत असे खडसे म्हणाले. माझ्या मुलाचा खून झाला की आत्महत्या याबद्दल बोलायचे झाले तर केंद्रामध्ये यांचं सरकार आहे, त्यांना अशी शंका असेल तर चौकशी करायला माझी हरकत नाही. त्यावेळेस मी घरी नव्हतो, त्यासंदर्भात सीबीआय वगैरे आणखी यंत्रणांनी चौकशी करावी असेही खडसे म्हणाले.

हे ही वाचा : 

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम ‘मुनमुन दत्ता’चा जर्मनीत अपघात, जाणून घ्या तिच्या प्रकृती विषयी अपडेट

भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं, मृतांचा आकडा ४० वर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version