Nagpur Accident Case: अपघातातील गाडी Sanket Bawankule याचीच; नागपूर पोलिसांचा दुजोरा

Nagpur Accident Case: अपघातातील गाडी Sanket Bawankule याचीच; नागपूर पोलिसांचा दुजोरा

Nagpur Accident Case: नागपूर अपघातप्रकरणाबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) आज (मंगळवार, १० सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत नागपूर अपघाता प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्या गाडीने हा अपघात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता नागपूर पोलिसांनी याला दुजोरा दिला असून ‘अपघातात वापरलेली गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आता बावनकुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही: नागपूर पोलिस

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. ते म्हणाले, “अपघातात वापरलेली गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. कारमध्ये तीन लोकं होते, अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे हे गाडीत होते. तिघांचीही चौकशी केली आहे, त्यात गाडी चावणारा अर्जुन हावरे याला अटक केली होती. पण नंतर त्याला बेल मिळाली. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे, अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होता,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “या अपघातात कोणीही गंभीर जखमी नाही. संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलवले होते आणि त्याने कबूल केले होते की ते त्या गाडीत होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, आम्ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करत आहोत. सीसीटीव्ही डिलीट केले हे सत्य नाही, असे कुठे ही आढळले नाही. हे कुठून येत होते याचा तपास केला असून ते लाहोरी हॉटेल येथून येत होते. या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे, यात दोन कार व एक दुचाकीचा समावेश आहे. त्या रात्री दोघांना पकडले असून त्यांची मेडीकल झाली आहे पण संकेत बावनकुळे त्या गाडीत होते हे उशीरा समजले त्यांची चौकशी सुरु आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version