Nagpur Accident Case: फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे या अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव: Sushma Andhare

Nagpur Accident Case: फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे या अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव: Sushma Andhare

Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. एकीकडे विरोधक यावरून चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट नागपूर गाठले आहे. नागपूरमघील सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघातातील गाडीचा नंबर एफआयआरमध्ये दाखल का नाही? संकेत बावनकुळेंची वैद्यकीय तपासणी का केली नाही? असा सवाल त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला.

सुषमा अंधारे यांनी सीताबर्डी पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संकेत बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी या अपघातातील मुख्य फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. जितेंद्र सोनकांबळे यांनी या अपघाताची तक्रार दाखल केली होती. तसेच, “जितेंद्र सोनकांबळे या अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव आणला जातो आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण द्या; सुषमा अंधारेंची माहिती

यावेळी माध्यमांशी संवाद साधत सुषमा अंधारे म्हणाल्या, “आतमध्ये डीसीपी आणि पीआय यांना काही प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की आमचा तपास सुरु आहे, जर तुमचा तपास सुरु आहे तुम्हाला कळलं आहे की गाडी कोणाची आहे तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही ? आरोपी अजून एक वाढवत का नाहीत ? त्यावर ते मौन आहेत. तक्रार दाखल करणाऱ्याला फिर्यादीवर प्रचंड दबाव आहे, जितेंद्र सोनकांबळे हे फिर्यादी आहेत ते अनुसूचित प्रवर्गात येतात, या सगळ्यात एका अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव आणला जातो आहे. अजूनही फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यावर बोललेले नाहीत, माध्यमांसमोर आले नाहीत मला त्यांच्या जिवीताची जास्त काळजी आहे. फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

जर Mahavikas Aghadi चे सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील: Chandrashekhar Bawankule

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version