spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. एकीकडे विरोधक यावरून चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच आता महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्येच जुंपली असल्याचे दिसत आहे. आता काँग्रेसचे (Congress) आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी यावर केलेल्या भाष्यावरून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ‘घोर कलियुग’ म्हणत चांगलीच आगपाखड केली आहे. त्यावर आता विकास ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे

विकास ठाकरे यांनी काल (मंगळवार, १० सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत नागपूर प्रकरणावर भाष्य केले होते. “नागपूरमध्ये जो अपघात झाला त्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते अशा चर्चांना उधान आले होते. मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातील घटना आहे यामध्ये खरं तथ्य काय आहे हे शोधा. काल पोलीस यंत्रणेने तपास केला, सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामध्ये असे समजले की संकेत बावनकुळे गाडीमध्ये बसले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता सोबत आणखी एक मित्र होता. गाडीवर नियंत्रण नसल्याने ही घटना घडली आहे, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेतून नेत्यांच्या मुलांनी काहीतरी बोध घ्यावा, नेत्यांनी मुलांना समजवावे. राजकीय माणूस असला आणि त्याच्या मुलाने काही केले की त्याचे राजकारण होते,” असे ते म्हणाले.

सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर ?

विकास ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियाच देत सुषमा अंधारे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली होती. त्या म्हणाल्या, “संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी तर प्रयत्न करतच आहेत पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचे अनाकलनीय आहे. पोलीस स्वतः सांगताहेत की संकेत त्या गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतात संकेतचा संबंधच नाही..!! घोर कलियुग..!!!”

विकास ठाकरे यांचे प्रत्युत्तर

सुषमा अंधारेंच्या पोस्टला प्रत्युत्तर देत विकास ठाकरे यांनीही ट्विटर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “सुषमाताई, मी काय बोललो याचे आकलन बहुधा आपल्याला झाले नसावे. संकेत बावनकुळे दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा व्हावी अशी स्थानिक आमदार म्हणून मी मागणी केली आहे. दोषी असेल तर सोडू नका जर दोषी नसेल तर विनाकारण राजकारण नको. सर्वच नेत्यांनी आपल्या मुलांना योग्य समज द्यावी अशी स्पष्ट भूमिका मी मांडली आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करुन आपण माझ्यावर का आरोप करीत आहात हे समजणे माझ्यासाठी अनाकलनीय आहे.”

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss