Namo Rojgar Melava CM Eknath Shinde Live: आज सर्वांची उपस्थिती कारण, आमचं सरकार राजकारणविरहित

Namo Rojgar Melava CM Eknath Shinde Live: आज सर्वांची उपस्थिती कारण, आमचं सरकार राजकारणविरहित

बारामतीमध्ये आज नमो रोजगार मेळाव्याचे योजित करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ४३ हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगतला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. स्वतःचे आणि राज्याचे भवितव्य घडवून आणण्यासाठी अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन होणे गरजेचे आहे. याआधीचे रेकॉर्ड तोडणाऱ्या अशा मेळाव्याचे आयोजन बारामतीमध्ये करण्यात आले आहे. बारामती पोलीस स्थानक आणि बस स्थानक यांच्या कामांमध्ये कुठेही क्वालिटी कमी पडू दिली नाही. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे हात निर्माण करा, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. त्यांच्याच म्हणण्याचे अनुकरण करत आमचं सरकार नोकऱ्या देणारे हात निर्माण करत आहे. उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहे. विकास करणारे हे आपले सरकार आहे, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले.

नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून या मेळाव्यातून २५ हजार युवकांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बारामती शहर हे एक विकासाचे मॉडेल आहे असेही ते म्हणाले. मेळाव्याला सर्वांची उपस्थिती आहे कारण आमचं सरकार राजकारणविरहित असल्याचे यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बारामती येथे विविध विकास कामांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. बारामती बसस्थानक, अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस वसाहत, बऱ्हाणपूर येथे नवनिर्मित पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Namo Rojgar Melava CM Eknath Shinde Live: आज सर्वांची उपस्थिती कारण, आमचं सरकार राजकारणविरहित

Namo Rojgar Melava साठी मुख्यमंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version