नागपूरमध्ये आज भाजपच्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

नागपूरमध्ये भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आज राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूरमध्ये आज भाजपच्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

नागपूरमध्ये भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आज राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur News) विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात हे संमेलन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील १ लाख युवक सहभागी होणार आहेत, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) हे सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

यंदाचे वर्षे हे निवडणुकांचे वर्षे असणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये तरुण मतदार संघांचा कल निर्णायक ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमताचे सरकार देशात स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने आपली पूर्ण आकडा युवा तरुणांवर दिली आहे. भाजप युव नमो राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन आज नागपूरमध्ये करण्यात आले आहे. या महासंमेलनात देशभरातील सुमारे १ लाखापेक्षा जास्त तरुण यात सहभागी होणार आहेत. संमेलनात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आगामी २५ वर्षांतील वाटचालीची दिशा मांडणार आहेत. हे अधिवेशन संपल्यानंतर राज्यभरातच ‘नमो युवा चौपाल’चे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, सरचिटणीस आणि प्रभारी सुनील बन्सल हे उपस्थित राहणार आहेत.

नागपूरमध्ये होणार असलेले हे आंदोलन म्हणजे तरुणांसाठी गर्जना असणार आहे. या संमेलनामध्ये विविध शाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्व क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर्सस सहभागी होणार आहेत. या संमेलनासाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. हा सोहळ्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उपस्थित राहणार आहेत. राणा दांपत्य भाजपच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

हे ही वाचा:

बाळूमामानंतर सुमीत पुसाळकर झळकणार ‘घरोघरी मातीच्या चुली’या नव्या कोऱ्या मालिकेत

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला होणार, काय आहे अंडरवॉटर मेट्रोची खासियत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version