Saturday, July 6, 2024

Latest Posts

दुष्काळात होरपळणा-या जनतेला Congress वा-यावर सोडणार नाही, Nana Patole

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्या आहेत.

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता या दुष्काळाने होरपळून निघाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहेत तर जनावरांना चारा नाही. महाभ्रष्टयुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे परंतु काँग्रेस (Congress) पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्या आहेत.

टिळक भवनमध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. जनतेने काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास दाखवलेला आहे. दुष्काळाने संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी सरकार उभे राहत नाही असे चित्र आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल. दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडेही मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, त्यासाठी खासदारांनी आपल्या मतदारसंघात दुष्काळी भागाचा दौरा करून आढावा घ्यावा. दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना आधार द्यावा तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लोकसभा निवडणुकांमधील (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रातील यशाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले व जनतेत मोठा आत्मविश्वास निर्माण केला. देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली, राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत व मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादीत केला आहे. काँग्रेसच्या या विजयात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे समर्थन आहे. काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र Congress विचाराचे राज्य; आता लक्ष्य Maharashtra Vidhansabha Election 2024: Ramesh Chennithala

NDA च्या बैठकीत पेटला हशा ; कारण ठरले ‘नितीश कुमार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss