Sunday, July 7, 2024

Latest Posts

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या प्रतिमेला फाडण्याच्या कृत्याला समर्थन नाही: Nana Patole

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा फाडली गेली. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र आपले हात वर केले आहे.

राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा फाडली गेली. यावरून विरोधकांनी राज्यभर निदर्शने आणि आंदोलने करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण देत माफीही मागितली आहे, यावर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांनी आव्हाड यांची बाजू घेत ‘जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरवादी असून त्यांच्या हातून चुकून ते कृत्य घडले आहे,’ असे स्पष्टीकरण दिले मात्र, काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र याविषयावर आपले हात वर केले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फाडण्याचा जे कृत्य झालेला आहे त्याचा समर्थन कधीही करता येत नाही आणि आम्ही सुद्धा काँग्रेसचा समर्थन करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आम्हाला जगातल्या सर्वात शक्तिशाली लोकशाहीचे सविधान मिळालेला आहे. त्यामुळे या महामानवाचा अपमान जो कोणी करेल त्याचा समर्थन करण्याचे कारण होऊ शकत नाही. मात्र मनुस्मृतीचा विरोध काँग्रेसने पहिले केला आताही करेल आणि उद्याही करेल. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवून या राज्यात आणि देशात अगर कोणी मनुस्मृती आणत असेल त्याला काँग्रेस कडाडून विरोध करेल,” असे त्यांनी यावेळी म्हंटले.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीकडून राज्यभर निदर्शने केली गेली. मात्र, महायुतीचा घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद आव्हाड यांची बाजू घेत ‘आव्हाड चांगल्या भावनेने तिथे गेले होते, त्यांनी चुकून पोस्टर फाडले,’ असे वक्तव्य केले होते. मात्र, महाविकास आघाडीचा भाग असलेले काँग्रेसचे नाना पटोले यांनी या प्रकरणातून हात वर केले आहेत.

हे ही वाचा:

भ्रमित विरोधी पक्ष दुष्काळासारख्या विषयावर दुर्दैवाने राजकारण करत आहे: Pravin Darekar

उडता पंजाब सारखं उडता पुणे तयार झाले आहे: Ravindra Dhangekar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss