Nanded MP Vasant Chavan: विनम्र, लोकाभिमुख आणि अनुभवी नेतृत्व हरपले, Vasant Chavan यांच्या निधनाने राजकीय विश्वात दुःखाची छटा

Nanded MP Vasant Chavan: विनम्र, लोकाभिमुख आणि अनुभवी नेतृत्व हरपले, Vasant Chavan यांच्या निधनाने राजकीय विश्वात दुःखाची छटा

ज्येष्ठ काँग्रेस नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांचे निधन वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. याबाबत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीसुद्धा श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दांत शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले लोकाभिमुख असे नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले की, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहीला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Sanjay Raut यांच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून MAHAYUTI वर आरोपाच्या थेट फैऱ्या..

Atul Benke यांची Sharad Pawar यांच्यासोबत भेट; पुण्यातील राजकीय भेटी ठरणार गेमचेंजर ?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version