Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Chh. Shahu Maharaj, Fatima Sheikh यांना भारतरत्न द्या, Naseem Khan यांची राष्ट्रपती Draupadi Murmu आणि PM Narendra Modi यांच्याकडे मागणी

राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त (Chh. Shahu Maharaj 150th Birth Anniversary) त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस (Congress) नेते नसीम खान (Naseem Khan) यांच्याकडून करण्यात आली आहे.

काल (बुधवार, २६ जून) राजश्री छत्रपती शाहू महाराज (Chh. Shahu Maharaj) यांची १५० वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीत समतेची बीजे रोवणाऱ्या आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त (Chh. Shahu Maharaj 150th Birth Anniversary) त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस (Congress) नेते नसीम खान (Naseem Khan) यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या फुले दांपत्यासोबत भक्कमपणे उभ्या असलेल्या प्रथम महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनादेखील भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पात्र लिहून लेखी मागणी केली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा १५० व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॉँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लेखी पत्र देऊन अशा थोर महापुरुषांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची लेखी मागणी केली.

नसीम खान यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “मागासवर्गीय समाजाला पहिले ५०% आरक्षण देणारे, सर्व समाजासाठी वसतीगृह बांधणारे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाचे पवित्र असे कुराण मराठीत भाषांतर करणारे, मुस्लिम विद्यार्थ्याकरिता वसतिगृह बांधणारे, समाजातील अस्पृश्यता नष्ट करणारे, महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचा हित साधणारे, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तसेच समता, बंधुता,धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी अशी तत्त्वे पाळणारा आणि कोणताही जात पंथाची परवा न करता समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य धारेत आणणाऱ्या शाहू महाराजांना तसेच भारतीय शिक्षकतज्ञ, समाज सुधारक आणि भारताच्या प्रथम महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मान राखावा,” अशी मागणी आपल्या लेखी पत्रात केली.

हे ही वाचा:

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत वाद?

Mansoon Session 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे, सभागृहात वाचून दाखवण्यात आली नावे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss