Saturday, June 29, 2024

Latest Posts

माजी आमदार Vasant Gite यांच्या कार्यालयावर कारवाई, कार्यकर्ते आक्रमक

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आणि माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांच्या कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Corporation) कारवाई करण्यात आली आहे. नाशिक मधील मुबई नाका परिसरातील कार्यालय पाडण्यासाठी महापालिका अधिकारी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन दाखल झाले. त्यामुळे आजुबाचुच्या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर गीते यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. यावेळी वसंत गीते यांनी माध्यमांशी संवाद साधत, “या सर्व राजकीय सुडापोटी चाललेल्या कारवाया आहेत,” असे म्हंटले आहे.

यावेळी वसंत गीते म्हणाले, “या सर्व राजकीय सुडापोटी चाललेल्या कारवाया आहेत. मध्य नाशिकचे आमदार पेटून उठले आहे. लोकसभेची झळ इथपर्यंत पोहोचले आहे. महापालिकेने ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता १ वर्ष पूर्वी मोजली आहे. ३५ वर्षापासून माझे कार्यालय इथे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे आलेले आहे. मुख्यमंत्री राजकीय पोटी ही कारवाई करण्यात येत आहे. बड्या भाभी ला हे समजायला पाहिजे. छोटी भाभी आत मध्ये आहे बडी भाभी बाहेर कारवाई करते आहे. आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. देव त्यांना सुबुद्धी देवो. आम्ही कोणाच्या विरोधात नाही कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू,” असे ते म्हणाले.

नाशिक महापालिकेने यापूर्वीच वसंत गीते यांच्या कार्यालयाच्या अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. हे कार्यालय पाक्क्या बांधकामाचे नसून केवळ एक पत्र्याची शेड आहे. तसेच गीते यांना बजावलेल्या नोटिशीत हे बांधकाम राज्य परिवहन मंडळाच्या जागेवर असल्याचे म्हंटले आहे. त्यानांतर वसंत गीते यांनी उसाचं न्यायालयात या कारवाईला आव्हान दिले होते. यावर न्यायालयात अद्याप सुनावणी झाली नसून हि कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Budget Session 2024: राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प, Nana Patole यांची टीका

Maharashtra Budget Session 2024: आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’, Jayant Patil यांची मिश्किल टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss