Nashik Sinnar Accident , सिन्नर तालुक्यात भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अजून एका अपघाताची भर पडली आहे.

Nashik Sinnar Accident , सिन्नर तालुक्यात भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

Nashik Sinnar Accident : सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अजून एका अपघाताची भर पडली आहे. आज दि १३ जानेवारी रोजी पहाटे नाशिक-शिर्डी महामार्गावर (Nashik Shirdi Highway) वावी-पाथरे गावाजवळ एक भीषण अपघात झाला. हा अपघात खासगी बस आणि ट्रकचा झाला आहे. या भीषण अपघातात जवळपास १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याच सोबत जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत आहेत. तर या भीषण अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Major Accident) झाल्याची घटना आज सकाळी घडली. मुंबई मधून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अंबरनाथ, ठाणे परिसरातील सुमारे जवळपास ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती कळताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत १० जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. हा सर्व अपघात एवढा भीषण होता कि बसचा चुराडा झाला आहे. एका बाजूला बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले. एकूणच नाशिक शहरासह जिल्ह्यातील आपघातांचे सत्र सुरूच असून यंदाच्या वर्षांतील सर्वात भयानक अपघात म्हणावा लागणार आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खानने Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक SUV केली लाँच, शाहरुखच्या अनोख्या स्टाइलचे फोटो होतायत व्हायरल

भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण, मोदींनी मांडली भारताच्या आर्थिक परिवर्तनाची गोष्ट

थलपथी विजयचा चित्रपट वारिसू झाला लीक, या साइट्सवरून करता येतोय डाउनलोड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version