Thursday, July 4, 2024

Latest Posts

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ, दोन जास्त मतपत्रिका…

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने चौरंगी लढत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade), अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रमुख लढत आहे. आता या चौरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या मतदारसंघात मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. एकूण ९३.४८ टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत ६४ हजार ८४८ मतपत्रिका अपेक्षित होत्या. मात्र काही वेळा पूर्वी मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आढळल्याने मतमोजणी केंद्रावर मात्र चांगलाच गोंधळ हा उडाला आहे.

मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी १ मतपत्रिका जास्त आढळून आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. याआधी चोपडा तालुक्यातील मतपेटीत ३ मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. आता पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने मतमोजणी केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत. या मतपत्रिकांचे नेमके करायचे काय? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss