spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतं थेट मुयख्यमंत्र्यांना पोलीस निरीक्षकाचं पत्र

धुळे (Dhule) पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे.

धुळे (Dhule) पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. पोलिसांना (Police) दिवाळी बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली आहे.

पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात पोलीस निरीक्षक चव्हाण पुढे म्हणतात की पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही संघटना नाही. त्यामुळे पोलिसांना कोणी वाली नाही. परिणामी सरकार दरबारी पोलिसांच्या प्रश्नांची, समस्यांची दखल घेतली जात नाही. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर तडजोड करण्याची सवय असते. तशीच तडजोड करुन फक्त एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकाने पात्र लिहिले आहे आणि त्या पत्रात ते म्हणाले आहेत कि, पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो. एका वर्षात ५२ शनिवार येतात. त्याचबरोबर पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना २४ पगारी सुट्या जास्त मिळतात. असे वर्षातील ५२ + २४ = ७६ असे ७६ दिवस पोलिसांना १२ ते १५ तास जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुम्ही दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार वाढवून द्यावा. “मुख्यमंत्री तुम्हाला सगळे अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतात. तुम्ही दयाळू आहात. त्यामुळे पोलिसांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या,” अशी विनवणी या पत्रात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांचे कार्यालय अशा विविध कार्यालंयामध्ये हे पत्र पाठवण्यात आलं आहे.

“सध्या महाराष्ट्रातील जनता म्हणते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू, अनाथांचा नाथ एकनाथ आहेत. तसंच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे आम्हा पोलिसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून ७६ दिवस १२ ते १५ तास जास्तीचे कर्तव्ये केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी अपेक्षा आहे,” असं पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

हे ही वाचा:

PFIवरील बंदीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…

पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई … – एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss