spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शुक्रवार,२० सप्टेंबर) महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट दिली. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishvakarma Yojana) वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते वर्धा वरून अमरावती टेक्सटाईल पार्कचं (Amaravati Textile Park) ई-भूमिपूजन करण्यात आले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही पार पडली. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क १००० एकरात उभारण्यात येत आहे. सरकारने वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

माझे स्वप्न आज साकार झाले आहे, नवनीत राणा झाल्या भावुक

अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व इतर मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा या भावुक झाल्या होत्या. यावेळी ज्या स्वप्नासाठी मी मागील दोन-तीन वर्षांपासून पाठपुरावा केला ते स्वप्न आज साकार झाले आहे. अमरावतीत कॉटनचे सगळ्यात जास्त उत्पादन होते त्यामुळे असा प्रकल्प आला तर शेतकरी, युवकांचे भविष्य उज्वल होईल यासाठी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प अमरावतीत आला ही अमरावतीसाठी खूप मोठी भेट आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss