spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विश्व हिंदू परिषदेची मागणी, ‘गरबा उत्सवात आधार कार्ड…’

आजपासून शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2022) उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे.

आजपासून शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2022) उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक मोठी मागणी केली आहे.

गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे. गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी असा उद्देश विश्व हिंदू परिषदेचा या मागणी मागचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे (Vishwa Hindu Parishad Vidarbha Province Chief Govind Shende) यांनी दिली आहे. गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजन स्थळे उभे राहून मंडळांना मदत करतील, आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा असे शेंडे म्हणाले.

हे ही वाचा:

आमदार संतोष बांगर यांच्या ताफा शिवसैनिकांनी अडवला, ‘माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे करणार’

Game of thrones : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या एपिसोडचा ट्रेलर प्रदर्शित

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या शैलपुत्री रुपाची महापूजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss