spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या शैलपुत्री रुपाची महापूजा

आज घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्राला विशेष महत्त्व असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून तसेच देवीच्या विविध रूपांची पूजा करून नवरात्रीचा सण साजरा केला जातो. तर, महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठांसोबत देवीची विविध प्राचीन आणि प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत. या ठिकाणी देखील आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा करण्यात आली.

हेही वाचा : 

राज ठाकरेंचा ‘एकला चलो रे’चा नारा आता कोकणाकडे वळणार, विदर्भानंतर आता मिशन कोकण

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात भल्या पहाटे देवीची विधीवत पूजा करुन आरती करण्यात आली. पुढे पावणे नऊ वाजता तोफेच्या सलामीनं मंदिरात घटस्थापना होईल. घटस्थापना आणि दरम्यानच्या काळात मंदिर परिसरात होणारी गर्दी पाहता पोलीस यंत्रणाही सज्ज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने देवस्थान समितीच्या वतीने पेड ई पास सुविधेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंदिरात ई पेड पास सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी सर्व भक्तांना एकाच दर्शन रांगेतून देवीचं दर्शन दिल जातं आहे.

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०२२, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे

तुळजाभवानीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली

गेल्या ९ दिवसापासुन मंचकी निद्रा अवस्थेत असलेल्या तुळजा भवानीची आज पहाटे सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. इथं दुपारी घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी देवीच्या मुर्तीची विधीवत पुजा करून देवीला मुळ सिंहासनावर नेण्यात आले.

कारल्याच्या एकविरा देवीच्या चरणांशी भक्तांची गर्दी

नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं लोणावळ्यातील कार्ला एकवीरा मंदिराला असंख्य भाविक भेट देत आहेत. आगरी आणि कोळी समाजाची आराध्य असणाऱ्या आई एकविरेचरणी अनेकजण श्रद्धा अर्पण करत आहेत.

उपवासाठी चमचमीत आणि स्वादिष्ट वरीची खिचडी

Latest Posts

Don't Miss