शेतकरी आणि अग्नीवीर आंदोलनात नक्षलवाद्यांचा हात

शेतकरी आणि अग्नीवीर आंदोलनात नक्षलवाद्यांचा हात

काही दिवसांपूर्वी कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसा असो किंवा अग्निवीर योजनेसंदर्भात झालेला हिंसाचार. तरुणांची माथी भडकावून देशात अस्थिरता निर्माण केल्याची कबुली आता खुद्द नक्षलवाद्यांनी दिल्याचं समोर येत आहे. भविष्यात सुद्धा अशा आंदोलनात आमचे लोकं घुसखोरी करतील असा दावा ही माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने एका पत्राच्या माध्यमातून केला आहे. भविष्यात नक्षलवादी ते सैन्याच्या अग्नीवीर भरती प्रक्रियेच्या किंवा इतर पोलीस भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्यात किंवा पोलीस दलात शिरून गोपनीय माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात ही आहेत का असा संशय सेंट्रल कमिटीच्या पत्रकाच्या माध्यमातून मिळाला आहे.

नक्षलवाद्यांच्या ( माओवाद्यांच्या ) सेंट्रल कमिटीने एक पत्रक काढले आहे. त्या पत्रकात लिहलं आहे कि, दिल्ली येथील हिंसक शेतकरी आंदोलनात यशस्वीपणे घुसखोरी केल्याचे नक्षलवाद्यानी म्हंटले आहे. सेंट्रल कमिटीच्या नक्षली नेत्यांनी या पत्रकात आपल्या कॅडरला अशाच प्रकारच्या आंदोलनामध्ये खुले व गोपनीय पद्धतीने घुसायचे आदेश ही दिले आहेत. भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनेच्या विरोधात भडकलेल्या आंदोलनातही माओवादी सक्रिय होते असे या पत्रकात सांगण्यात आले आहे. नक्षलींच्या ‘युनायटेड फोरम’ म्हणजेच संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गाने इतर अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती ही या पत्रकातून दिली आहे.

सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो ? जाणून घ्या कारणे

या पत्रकात नक्षलवादी सेंट्रल कमिटीने नक्षलवाद्यांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांची वर्षभर देशातल्या विविध भागात केलेल्या हिंसक कारवायांचा लेखाजोखा तर मांडला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात बंद असलेल्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केल्याची माहिती ही सेंट्रल कमिटीने दिली आहे. शिवाय देशातील विविध मोठ्या उद्योग समूहांना औद्योगिक कामांसाठी मिळणाऱ्या जमिनी, खाणी आणि इतर सवलतीच्या विरोधात हिंसक आंदोलन यशस्वीरित्या करता येईल.तसेच धार्मिक अल्पसंख्यांक आणि महिलांवरील अत्याचार वाढल्याच्या मुद्द्यावरही असेच आंदोलन उभे करता येईल असा भविष्याच्या रोडमॅपचा उल्लेख ही या पत्रकात केला आहे.

हे ही वाचा:

आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

ICC ने क्रिकेटचे नवीन नियम जाहीर, नवीन नियम या दिवसा पासून लागू होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version