Thursday, July 4, 2024

Latest Posts

NEET Paper Leak Case: लातूर कनेक्शन आले समोर! एक शिक्षक ताब्यात तर दुसरा फरार!

नीट पेपर फुटीप्रकरणात (NEET Paper Leak Case) आता मोठी अपडेट आली असून यामध्ये लातूर कनेक्शन (Latur News) समोर येत आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणात (NEET Paper Leak Case) आता मोठी अपडेट आली असून यामध्ये लातूर कनेक्शन (Latur News) समोर येत आहे. या प्रकरणात नांदेड एटीएसच्या (ATS) पथकानं लातूरमधील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं असून आणखी एक शिक्षक फरार झाले आहेत. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेड एटीएस पथकानं शनिवार, २२ जुन रोजी लातूरमधील दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेहोते. काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र काही तासांनी लातूर पोलिसांनी पुन्हा तपास केला असता यातील एका शिक्षकाला ताब्यात घेतले असून दुसरा शिक्षक फरार झाला आहे. फरार शिक्षकाचे नाव संजय जाधव असून त्याचा छडा लावण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तसेच, दुसरे शिक्षक जलील उस्मानखॉं पठाण याला ताब्यात घेण्यात आले आहे.

फरार शिक्षक संजय जाधव सध्या सोलापूरमधील टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असून ते मुळचे बोधी तांडा ता. चाकूर येथील रहिवासी आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेले जलील उस्मानखॉं पठाण हे कातपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असून अंबाजोगाई रोड येथील रहिवासी आहेत. लातूर पोलिसांनी हि कारवाई केली असून फरार शिक्षकाला पकडण्यात त्यांना अद्याप यश आले नाही.

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या (NEET Exam) परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या घोटाळ्यातील महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. ‘लातूर पॅटर्न’ शिक्षणामुळे ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे सापडले आहेत. लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात नीट आणि जेईई तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेत असतात. अश्यातच नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे या शहराचे काही धागेदोरे सापडतात का? या दृष्टीने तपास सुरु केला असता नांदेड एटीएस च्या हाती दोन शिक्षक लागले. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर लातूर पोलिसांनी पुन्हा त्यातील जलील पठाण याला ताब्यात घेतले असून दुसरा शिक्षक संजय जाधव फरार झाला आहे. पोलीस या प्रकरणात कसून चौकशी करत असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात आणखीन नावे समोर येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पोईस तपस करत आहेत.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss