spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

नीट युजी २०२३ (NEET UG 2023) या परीक्षेचा निकाल हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर झाला आहे. तामिळनाडू या राज्यातील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवती ९९. ९९ मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नीट युजी २०२३ (NEET UG 2023) या परीक्षेचा निकाल हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर झाला आहे. तामिळनाडू या राज्यातील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवती ९९. ९९ मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या श्रीनिकेत रवीनं बाजी मारत राज्यात पहिला आला आहे. महाराष्ट्र राज्यातून पहिला क्रमांक पटकावणारा श्रीनिकेत रवी हा देशातून सातव्या क्रमांकावर आहे. नीटच्या परीक्षेसाठी देशभरातून २०,३८,५९६ विद्यार्थी बसले होते. त्यातील एकूण ११,४५,९७६ विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले असून सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातील १,३९,९६१ विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचे १,३१,००८ विद्यार्थी आणि राजस्थानातील १,००,३१६ विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी ७२० पैकी १३७ गुण अनिवार्य आहेत. त्याचबरोबर ओबीसी (OBC) एसटी (ST), एससी (SC) या श्रेणीतील मुलांना ७२० पैकी १०७ गुण अनिवार्य आहेत.

महाराष्ट्र राज्यात श्रीनिकेतसोबतच अजून दोन विद्यार्थ्यांनी टॉप ५० च्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांची नावे तनिष्क देवेंद्र भगत (AIR 27) आणि रिद्धी वजरीनकर (AIR 44) आहेत. महाराष्ट्राचे एकूण १,३१,००८ विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS), बीएएमएस (BAMS), बियुएम (BUM), बीएसएमएस (BSMS) या वैदयकीय पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी गरजेच्या असलेल्या नीट युजी २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते.

महाराष्ट्र राज्यातून नीट परीक्षेत पहिला आलेला श्रीनिकेत हा खारचा रहिवासी आहे. निकाल पाहून श्रीनिकेत म्हणाला, रँक (Rank) अनपेक्षित होता पण मला माहित होते की मी उत्तम कामगिरी करणार आहे. मला खूप आनंद आहे की मी माझ्या पालकांप्रमाणे चांगले गुण मिळवले आहे.

हे ही वाचा:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार

ऍड वॉरमध्ये यु टर्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss