Thursday, July 4, 2024

Latest Posts

New Criminal Laws Change : देशात आजपासून लागू झाले “हे” नवे कायदे

देशात पहिला गुन्हा हा नवी दिल्लीत दाखल करण्यात आला आहे. या नव्या कलमांसोबत केसेसची संपूर्ण सुनावणी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाणार आहेत आणि समन्स, ऑर्डर ही ई-मेल द्वारे दिले जाणार आहेत. हे नवे कायदे लागू झाल्याने आता शिक्षेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

आजपासून देशात नवी क्रांती होताना दिसत आहे कारण देशात आजपासून प्रमुख ३ नवे कायदे लागू होणार आहेत. इंग्रजांच्या काळात असलेले जुने कायदे बदलून आजपासून फौजदारी कायदे लागू होणार आहेत. मात्र आजपासून म्हणजेच १ जुलै २०२४ पासून लागू केलेल्या त्या तीन कायदांना विरोध करताना देखील दिसून आला. पण ते तीन नवे कायदे आहेत तरी कोणते हे आपण पाहुयात..

जुन्या भारतीय दंड संहितामध्ये ५११ कलम होती मात्र आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे हे तीन नवे कायदे आजपासून देशात लागू होणार आहेत. आधी भारतीय दंड संहिता होती त्या बदल्यात भारतीय न्याय संहिता लागू झाला आहे. तर फौजदारी प्रक्रिया संहिताच्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता लागू झाली आहे. पुरावा कायदा ऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा असणार आहे. भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम कायदा लागू केला जाणार आहे. हे तीन नवे कायदे जरी लागू केले असले तरी जुन्या खटल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जे जुने कायदे होते ते जुन्याच आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यानुसार सुरुच राहतील.

कोणत्या गुन्ह्यावर कोणते कायदे लागणार ? 

भारतीय दंड संहितामध्ये ५११ कलम होती मात्र त्या बदल्यात आता भारतीय न्याय संहितेत ३५८ कलम लागू झालं आहे. त्याचबरोबर आता फसवणुकीसाठी कलम ४२० च्या ऐवजी कलम ३१६ वापरले जाणार आहे. खुनासाठी ३०२ कलम लागू करण्यात आला होता पण आता कलम १०१ वापरले जाणार. ६ प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षेच्या स्वरुपात सामाजिक सेवेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ४७ कलमे अधिक म्हणजेच ५३१ कलमे असणार आहेत.

नव्या कायद्यानुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये बलात्कार प्रकरणात कलम ६४ नुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच देशात पहिला गुन्हा हा नवी दिल्लीत दाखल करण्यात आला आहे. या नव्या कलमांसोबत केसेसची संपूर्ण सुनावणी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाणार आहेत आणि समन्स, ऑर्डर ही ई-मेल द्वारे दिले जाणार आहेत. हे नवे कायदे लागू झाल्याने आता शिक्षेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss