spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवे वर्ष,नवे नियम ! जाणून घ्या काय आहेत बदल आणि त्याने तुमच्या बजेटवर कसा होणार परिणाम

आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेक जण नवीन वर्षात नवीन गोष्टींची सुरुवात करतात.काहीजण नवीन गोष्टी विकत घेतात तर काही नवीन संकल्प करतात.

आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेक जण नवीन वर्षात नवीन गोष्टींची सुरुवात करतात.काहीजण नवीन गोष्टी विकत घेतात तर काही नवीन संकल्प करतात. जर तुम्ही पण काही नवीन गोष्टी करत असाल किंवा नवीन वस्तू विकत घेणार असाल तर त्याआधी आता तुम्हाला तुमचा खिशातील पैस कसा वाचवता येईल याकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच व्यावसायिक क्षेत्रात देखील अनेक नवीन बदल आजपासून होणार आहेत. या बदलांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फरक हा तुमच्या बजेट होणार आहे.

जाणून घ्या काय आहेत हे बदल:

१. GST

१ जानेवारी २०२३ पासून GST नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सरकारने ई – इन्व्हॉईसिंग आणि इलेक्ट्रॉनिक बिलाशी संबंधित काही बदल केले आहेत. आजपासून ई – इन्व्हॉईसिंग थ्रेशोल्ड मर्यादा ही २० कोटींवरून ५ कोटींवर करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या व्यावसायिकांची व्यापाराची उलाढाल हि ५ कोटी किंवा त्याहून जास्त असेल त्यांना इलेक्ट्रॉनिक बिल काढणे गरजेचे आहे.

२. गॅस सिलेंडर

१ जानेवारी २०२३ पासून गॅस सिलेंडरच्या दारात सुद्धा बदल करण्यात आले आहेत. परंतु हे बदल घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात होणार नसून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात होणार आहेत. मुंबईमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत १७२१ करण्यात आली आहे.

३. क्रेडिट कार्ड

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. हे बदल क्रेडीट कार्डच्या वापरानंतर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटच्या संदर्भात आहेत.क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर मिळणारे रिवॉर्ड पॉईंट बदलणार असून ३१ डिसेंबर २०२२ पूर्वीच मिळालेले रिवॉर्ड पॉईंट रिडिम करून घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.

४. विमा प्रीमियम

2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. IRDAI वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.

५. पॅन कार्ड

आयकर विभागाने शनिवारी रात्री एक नोटीस जरी केली, ज्यामध्ये मार्च २०२३ पर्यंत जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले गेले नाही तर १ एप्रिल २०२३ पासून ते पॅन कार्ड निष्क्रिय ठरवले जाईल.

६. वाहन

२०२३ मध्ये वाहनाच्या किमतीमध्येही वाढ होणार आहे. MG Motor, Hyundai, Maruti suzuki,Honda, Tata Motors, Renault, Audi, Mercedes Benz या ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ करणार आहेत.

७. आयकर रिटर्न

गेल्या आर्थिक वर्षांचा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ होती. ज्यांची हि तारीख चुकली असेल त्यांना आता आयकर विभागाच्या पुढची नोटीस जरी होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. तसेच त्यांना १०,००० रुपाऊणपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

८. बँक लॉकर

रिजर्व बँक ऑफ इंडिया ने बँक लॉकर संदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. जर बँक लॉकर मधील वस्तूंची नुकसान झाले तर त्याची जबादारी बँकेची असेल,त्यामुळे बँकांची मनमानी आता बंद होणार आहे. त्यासाठी बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये एक करार होणार आहे. हा कारण ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध असणार आहे.

हे ही वाचा:

Earthquake नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली-हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के

Corona Virus नवीन वर्षातही कोरोनाच सावट कायम, सतर्क रहा !

चक्क कडाक्याच्या थंडीत बर्फात पोहोणारी हि सुंदरी कोण?, हा Viral Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss