spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डॉन दाऊदची माहिती देणाऱ्याला एनआयए कडून मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ची माहिती देणाऱ्याला २५ लाखाची रोख रक्कम देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, दाऊद सोबतच त्याचा राईट हॅन्ड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील यांच्यावर २० लाखाचे बक्षीस एन आय कडून जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक साक्षीदारावर वेगवेगळी रक्कम जाहीर केली आहे.

भारतात सगळ्या काळ्या व्यवहारात दाऊद इब्राहिमचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स, हत्यारे, स्फोटक अशा अनेक अनधिकृत व्यवहारात त्याचा हात असल्याने फुस मिळत आहे ज्यातून देशाच्या सुरक्षेतेमध्ये धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे दाऊद ची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची एनआयए कडून घोषणा करण्यात आली.

हेही वाचा : 

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांची मेळघाटात हवा

इब्राहिमचा भाऊ हाजी अनीस, त्याचा खास जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, छोटा शकील आणि इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेनन ऊर्फ टायगर मेनन यांची माहिती देणाऱ्यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. छोटा शकीलवर २० लाख आणि उर्वरित अनीस, चिकना, मेननवर १५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड असलेला इब्राहिम याच्यावर २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं २५ लाख डॉलरचं बक्षीस याआधीच जाहीर केलं आहे. दाऊद भारतातील मोस्ट वॉन्टेड पुरुषांपैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा साथीदार अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत.

एनआयएने मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ ठिकाणांवर छापेमारी केली. हजी अली आणि माहीम दर्गाचे ट्रस्टी सुहाली खंडवाणी, १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला समिर हिंगोरा, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट, दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इक्बाल कास्कर, भिवंडीमधील कयाम शेख यांच्या ठिकाणांवर मे महिन्यात एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती.

एमएचटी – सीईटीच्या पीसीएम आणि पीसीबी गटासाठी होणार आन्सर की रिलीज; जाणून घ्या कशी करायची डाउनलोड

Latest Posts

Don't Miss