Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Kokan Graduate Constituency Election एकतर्फी, वातावरण महायुतीच्या बाजूने: Nitesh Rane

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातदेखील सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी बूथवर गर्दी केली आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावरून माध्यमांशी संवाद साधत, कोकण पदवीधर निवडणूक एकतर्फी असल्याचे सांगितले आहे.

राज्यात आज कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (Kokan Graduate Constituency Election) पार पडत आहेत. यासह मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघातही सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातदेखील सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी बूथवर गर्दी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजपच्या (BJP) निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि काँग्रेसचे रमेश किर (Ramesh Kir) यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावरून माध्यमांशी संवाद साधत, कोकण पदवीधर निवडणूक एकतर्फी असल्याचे सांगितले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभे आहेत. मागील १२ वर्षे या मतदारसंघात पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले, त्यांच्या विकासासाठी निधी दिली त्याच्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहे. महाविकास आघाडीचे नेते कुठेही कोकणात येताना दिसले नाहीत. जे नेते निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकले नाहीत ते नंतर काय येणार आहेत. कोकणातील वातावरण महायुतीच्या बाजूने आहे.”

कोकण मतदारसंघातील मतदान सुरु असून याबाबत बोलताना भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे म्हणाले, “मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आज पाऊस आहे पण तरी देखील मतदारांनी मतदान करावे. सातत्याने बारा वर्षे मी कामे केलीयेत. ⁠त्याचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचला आहे. खोटे आरोप विरोधक करतायेत, खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधक करतायेत. ⁠निश्चित पणे मी हॅट्रिक करणार. पदवीधरांशी मी आणि त्यांनी मला संपर्क केला यांवरुनच मला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणुन पाठिंबा दिला. ताकदीने महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केलंय. यामुळे या मतदारसंघात मोठा विजय मिळेल. मी सर्वच मतदारांना विनंती करतो कि सर्वांनी मतदान करावे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा

Rohini Khadse यांच्या ‘बदाम ‘टीकेला Chandrakant Patil यांचं दिमाखदार उत्तर

ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना अखिलेश यादव म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss