Nitin Deshmukh यांची जलसंघर्ष यात्रा रोखली, हात आणि पाय पकडून देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आज नागपूरच्या (Nagpur) सीमेवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) यांची जल संघर्ष यात्रा दाखल झाली आहे.

Nitin Deshmukh यांची जलसंघर्ष यात्रा रोखली, हात आणि पाय पकडून देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आज नागपूरच्या (Nagpur) सीमेवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) यांची जल संघर्ष यात्रा दाखल झाली आहे. परंतु त्यांची ही यात्रा मध्येच अडवण्यात आली आहे. आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अकोल्यातून दिनांक १० एप्रिल रोजी आमदार नितीन देशमुख यांची हि जल संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती.

अकोल्यातून दिनांक १० एप्रिल रोजी या जल संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती. तर उद्या दिनांक २१ एप्रिल रोजी नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. परंतु तिथे पोहचण्याआधीच नितीन देशमुख यांचे हात पाय पकडून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर जवळपास ५०० च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच नागपूरच्या सीमेवर या सर्वांना अडवण्यात आले आहे.

नागपूरच्या वेशीवर आज सकाळी ८ वाजता ही संघर्ष यात्रा धडकली. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन हे मोर्चेकरी आंदोलन करणार होते. त्यामुळे नागपूरच्या वेशीवरच वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला होता. तसेच दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली होती. ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर येताच पोलिसांनी आंदोलकांना वेशीवरच अडवलं. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची आंदोलकांनी परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. आंदोलकांनी नागपूरच्या वेशीवर रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार नसल्याचे देशमुख म्हणाले.

हे ही वाचा : 

Yemen च्या राजधानीमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, ७९ नागरिकांचा मृत्यू

Whatsapp युजर्ससाठी मोठी उपडेट, असं वापरता येणार नवीन अपडेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version