spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही”; Ajit Pawar यांचे वक्तव्य

सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडीना वेग आला आहे. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान अनेक प्रलंबित असे प्रश्न हे प्रलंबितच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु आहे. या लाडक्या बहीण योजनेचा दुसरा टप्पा पार पडत आहे. यात अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे. जाणूयात काय म्हणाले..

नेमकं काय म्हणाले ?

“नागपूर हे वैशिष्ट्य पूर्ण शहर आहे. यावेळचा हा मजा १० वा अर्थसंकल्प होता. यात स्त्रियांना केंद्र बिंदू करत त्यांच्या साठी ही योजना आम्ही निवडली. या चांगल्या योजनेची चेष्टा विरोधकांनी केली होती. आता ज्यावेळी ही योजना प्रसिद्ध झाली त्यावेळी विरोधकांना चपराक बसली. सोन्याचा चमचा तोंडात ठेऊन आलेल्या लोकांना काय समजणार १ ५ ० ०  ची किंमत. हि योजना नोव्हेंबर पर्यंत तर असेलच. तुम्ही महायुतीला मदत करा त्यावेळी ही योजना अजून पुढील पाच वर्ष चालेल. अन्नपूर्णा योजना आम्ही केली. आमच्या सरकत मध्ये पारदर्शक कार्य आहे. आम्ही हे पैसे थेट प्रत्येकाच्या बँक अकॉउंट मध्ये देणार आहोत. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलली आहे. सर्व जातीच्या बहिणींना यात स्थान आहे. मोलमजुरी करणाऱ्या बहिणींना या पैशाचे मोल आहे. एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही.  काम करणारे हे सरकार आहे. बहिणीसोबतच आता ४ ४  लाख शेतकऱ्यांना योजना काढिली आहे.  यांच्या लाडक्या भाव पासून. कल जगातील एका मोठ्या भूमिपुजन सोहळा पार पडला आहे”

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss