“बारसू”मध्ये आंदोलकांवर कोणातही लाठीचार्ज झालेला नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारसू रिफायनरी (Barsu Refinery) विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

“बारसू”मध्ये आंदोलकांवर कोणातही लाठीचार्ज झालेला नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारसू रिफायनरी (Barsu Refinery) विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू सर्वेक्षण होत असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परंतु बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या काळामध्ये त्यांची चर्चा सरकार सोबत होणार आहे. परंतु तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस आंदोलन स्थगित राहणार आहे.

सरकार सोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावेळी अनेक नागरिकांनी पोलिसांना बाजूला करत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांनतर वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी अश्रुधुराच्या नळकांडया पोलिसांनी फोडल्या आणि आंदोलन कर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला जात होता. यादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी माहिती समोर आली परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या ठिकाणी कोणताही लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं आहे.

बारसू मध्ये झालेल्या गोंधळाच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगत आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश होता असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. बारसूमध्ये सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज झालेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनाच्या आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version