आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

सध्या मुंबई, पुणे सह अनेक ठिकाणी ईडीच्या धाडी या पडत आहेत. नुकतेच ठाकरे गटाच्या निकटवर्तीयाच्या घरावर देखील ईडीकडून धाडी पडल्या होत्या. तर आता लगेच सांगलीत देखील ईडीकडून धाड पडली आहे.

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

सध्या मुंबई, पुणे सह अनेक ठिकाणी ईडीच्या धाडी या पडत आहेत. नुकतेच ठाकरे गटाच्या निकटवर्तीयाच्या घरावर देखील ईडीकडून धाडी पडल्या होत्या. तर आता लगेच सांगलीत देखील ईडीकडून धाड पडली आहे. काल दिनांक २३ जून रोजी सांगलीत पारेख बंधूंच्या दोन्ही बंगल्यांवर छापेमारी केली. तसेच या धाडीत ईडीच्या हाती खूप माहिती लागल्याचं सांगितलं जात आहे. अचानक पडलेल्या या धाडीमुळे सांगलीतील सर्वत्र खळबळ उडाली आहे. आर्थिक अनियमितता असल्याने पारेख बंधूंच्या घरी छापेमारी झाल्याचं सांगितलं जात आहे.

काल एकीकडे पारेख बंधू यांच्या घरी छापेमारी सुरू होती तर दुसरीकडे सांगलीतील ५ व्यापाऱ्यांच्या घरीही ईडीने छापे मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सांगलीतील ते पाच व्यापारी नक्की कोण आहेत असा सवाल सध्या केला जात आहे या पाचही व्यापाऱ्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. तसेच या व्यापाऱ्यांच्या घरी ईडीच्या हाती काय लागले? याची काहीच माहिती समोर येत नसल्याने व्यापारी वर्ग भयभीत आणि चिंताग्रस्त झाला आहे.

काल ईडीने सांगलीत धाड टाकली. सांगलीतील पाच व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयावर मूल्यवर्धित कर चुकवल्याप्रकरणी ईडीने छापेमारी केली. एकाच वेळी या पाच व्यापाऱ्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांची ईडीच्या एकूण ६० अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी आले होते. या अधिकाऱ्यांनी रात्री २.३० वाजेपर्यंत ही छापेमारी सुरू होती. विविध कागदपत्रांची छाननी केली जात होती. रात्री अडीच वाजता हे अधिकारी ५ ही व्यापाऱ्यांच्या घरातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले.

हे ही वाचा:

साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘Leo’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version