spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता मुंबई- शिर्डी आणि मुंबई-सोलापूर प्रवास होणार आणखी सुपरफास्ट, जाणून घ्या वंदे भारत एक्स्प्रेसची सविस्तर माहिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांनी आज मुंबईत दोन वंदे भारत एक्स्प्रेसला (vande bharat express) हिरवा झेंडा (Green Flag) दाखवला आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी(Mumbai to Shirdi) या त्या दोन गाड्या आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांनी आज मुंबईत दोन वंदे भारत एक्स्प्रेसला (vande bharat express) हिरवा झेंडा (Green Flag) दाखवला आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी(Mumbai to Shirdi) या त्या दोन गाड्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी हाय स्पीड एसी चेयर कार (Semi high speed AC Chair car) ट्रेन सेवा आहे. ही एक्स्प्रेस त्रंबकेश्वर, सिध्देश्वर आणि शिर्डी या तीर्थसक्षेत्रांना जोडली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये या ९ वी आणि १० वी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आहेत. मुंबई- शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी आज झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आज पासून या दोन्ही एक्सप्रेस आपल्या सेवेत रुजू झाल्या आहेत. या ट्रेनुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. परंतु वेळ जरी वाचणार असला तरी या ट्रेनसाठी इतर ट्रेनपेक्षा तिकीट दर जास्त असणार आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. जाणून घेऊया वेळापत्रक आणि तिकीट दर.

मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस कोणती ठिकाणे घेत येणार आणि किती वेळ लागणार आहे?

मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक २२२२३ ही गाडी सकाळी ६.२० वाजता सीएसटी वरून सुटेल आणि शिर्डी येथे ५ तास २० मिनिटांनी पोहचेल. म्हणजे सकाळी ११.४० वाजता शिर्डीला पोहचेल. सीएसएमटी(CSMT) निघणारी ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिक रोड वर थांबणार आहे.

तर शिर्डी ते मुंबई ट्रेन क्रमांक २२२२४ ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीहून सायंकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि मुंबईला रात्री १०.५० वाजता पोहचेल.

मुंबई ते शिर्डीचे भाडे –

मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअरच्या सीटसाठी प्रवाश्यांना ९७५ रुपये आणि १४८० रुपये मोजावे लागणार आहेत. या भाड्यामध्ये कॅटरिंगचा समावेश असेल. जर तुम्ही ओन बोर्ड कॅटरिंग(Catring) ची निवड न केल्यास तुम्हाला ८४० रुपये आणि १६७० रुपये द्यावे लागेल.

शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चे भाडे अनुक्रमे ११३० रुपये आणि चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअर कारसाठी २०२० रुपये भाडे असेल. यामध्ये कॅटरिंगचे शुल्क ही समावेश असेल. जर तुम्हाला कॅटरिंग नको असेल तर चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ८४० आणि १६७० रुपये असेल.

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस कोणती ठिकाणे घेत येणार आणि किती वेळ लागणार आहे?

सोलापूर ते मुंबई ट्रेन क्रमांक २२२२६ ही गाडी सोलापूरहून सकाळी ६.०५ वाजता सुटेल. ही गाडी पोहचण्यासाठी ६ तास ३० मिनिटे घेते मुंबईला १२.३५ वाजता पोहचेल. यादरम्यान ही गाडी कुकुर्वडी, पुणे, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबत सीएसएमटी या स्थानकांवर पोहचेल.

तर मुंबई ते सोलापूर ट्रेन क्रमांक २२२२५ ही गाडी सायंकाळी ४.०५ वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि ही गाडी रात्री १०.४० वाजता सोलापूर ला पोहचेल.

या दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.

मुंबई ते सोलापूर भाडे –

मुंबई ते सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअर कार सिट्साठी अनुक्रमे १३०० आणि २३६५ रुपये मोजावे लागणार आहे. या भाद्यामध्ये कॅटरिंग च समावेश असतो. कॅटरिंग ची निवड न केल्यास चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअर कार सिटसाठी अनुक्रमे १०१० आणि २०१५ रुपये भाडे द्यावे लागतील.

सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस चे भाडे ११५० रुपये आहे. चेअर कार आणि एकझिक्युटिव्ह चेअर कारसाठी २१८५ रुपये आहे. यामध्ये कॅटरिंग च समावेश आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रवासात कॅटरिंग चा समावेश नसेल करायचा तर तुमचे चेअर कार चे आणि एकझिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे अनुक्रमे १०१० आणि २०१५ रुपये असेल.

हे ही वाचा : 

Vande Bharat Express ला इगतपुरीत नो स्टॉप, तर नाशिकला फक्त दोनच मिनिट स्टॉप

वंदे भारत एक्सप्रेस हे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठ यशस्वी पाऊल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss