Friday, June 28, 2024

Latest Posts

OBC नेते Laxman Hake यांच्या ताफ्यावर दगडफेक, Beed मध्ये वातावरण तापले

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake), आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचा आभार दौरा काल (गुरुवार, २७ जून) रात्री बीड जिल्ह्यातील (Beed) मातोरी गावातून जाणार होता. पण त्यापूर्वी मातोरी या गावात रात्री काही समाजकंटकाकडून ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यावर अचानक दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे काही ओबीसी कार्यकर्त्यांच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली. तसेच गाड्यांच्या ताफ्यातील काही वाहनांचे नुकसानही झाले आहे. यामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असुन पोलिसांचा चोख बंदोबस्त लागवण्यात आला आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मातोरी हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुळगाव असून दगडफेकीच्या घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.

मातोरी गावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे, त्यामुळे ओबीसी आर्यकर्त्यांकडून खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे चौकात टायर जाळून समाजकंटकाचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजातील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा व ओबीसी समाजबांधवांना आवाहन करत,” लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला. गावाची शांतता बिघडवू नका,” असे म्हंटले आहे.

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन (Maratha OBC Resevation Dispute) वातावरण प्रचंड तापले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उपोषणाला स्थगिती मिळाली होती. गुरुवारी, २७ जून रोजी ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सिंदखेड राजा येथून महाएल्गार यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त सिंदखेड राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात केली होती. त्यांची यात्रा बीडमध्ये आली असता त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर नियोजित दौऱ्याप्रमाणे भगवानगडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन ते घेणार होते. पण त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी मातोरी मध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.

हे ही वाचा:

Maharashtra Session 2024 : विधीमंडळ परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी

Maharashtra Budget Session 2024: अर्थमंत्री Ajit Pawar करणार राज्याचा अर्थसंकल्प सादर, काय असतील नव्या योजना?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss