Sunday, July 7, 2024

Latest Posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार: Prakash Shedage

ओबीसी बहुजन पक्षाचे (OBC Bahujan Party) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेडगे (Prakash Shedage) यांनी येत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) सहावा टप्पा पार पडला असून ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. पण त्यानंतर, महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुका पार पडणार आहेत. ओबीसी बहुजन पक्षाचे (OBC Bahujan Party) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेडगे (Prakash Shedage) यांनी येत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले आहे. आज (रविवार, २६ मे) ओबीसी बहुजन पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी प्रकाश शेडगे म्हणाले, “आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारणीची लोकसभेच्या नंतरची पहिली बैठक झाली. या बैठकी मध्ये सगळ्या उमेदवारांचे अनुभव आम्ही ऐकुन घेतले. त्याप्रमाणे त्यांनी काही सुचना दिलेल्या आहेत, कि पुढची निवडणुक लढवताना कोणती काळजी घेतली पाहीजे? तसेच काय सुधारणा करायला लागणार आहेत त्या ही आम्ही ऐकुन घेतल्या. आता पदविधरांच्या निवडणुका होत आहेत. त्य़ासाठी शिक्षक मतदान संघ आहेत. दोन्ही मतदान संघामध्ये दोन्ही निवडणुका आम्ही लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे तसा ठराव देखील पास झालेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये २८८ मतदान संघामध्ये मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय आमचा झालेला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात अशा दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. ७० टक्के पदवीधर ओबीसी समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत,” असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “त्यांनी सरकारला अल्टीमेट दिलेला आहे. पण आमचा पण इशारा आहे कि प्रस्तापित सभांना दडपशाहिला बळी पडून जर ओबीसी विरोधात काही निर्णय केला तर मात्र ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत घराचा रस्ता सरकारला दाखवल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

…म्हणून केले निबंध स्पर्धेचे आयोजन, Ravindra Dhangekar यांचा खुलासा

गडकरींच्या पराभवासाठी मोदी – शाह – फडणवीस एकत्र; Sanjay Raut यांचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss