spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dasara 2022 : दसरानिमित्त साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, आज रात्रभर शिर्डीतील मंदिर दर्शनासाठी खुले राहणार

देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईसमाधी मंदिर हे आज (५ ऑक्टोबर) दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी दर्शन, निवास व भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्याकरिता पहिली बैठक साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. दसरा आणि पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे. शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

हेही वाचा : 

महिलांना निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यासह सक्षम करण्याची गरज: दसरा कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत

आज पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने देश- विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांच्या‌ गर्दीने शिर्डी नगरी फुलून गेली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना दर्शन सुकर व्हावे यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे. दसरा सण आणि पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून साई नामाचा जयघोष करत भाविक प्रसन्न वातावरणात साईबाबांचे दर्शन घेत आहेत. पुण्यतिथी उत्सवाला १०४ वर्षांची परंपरा असून आज भिक्षा झोळी, आराधना विधी यासह सायंकाळी पाच वाजता ज्या खंडोबा मंदिरात साईबाबा प्रथम नजरेस पडले तिथे सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात आज चार दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने साई चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे. १०३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी आपला देह ठेवला होता त्या द्वारकामाई परिसरात देखील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साई मंदिराला आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Dasara Melava : केवळ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला

दरम्यान आता शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.

Dasara 2022 : द्या दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा !

Latest Posts

Don't Miss