मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट ( tweet) केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रविवारी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट ( tweet) केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रविवारी एकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप भालेकर असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. भालेकर यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रदीप भालेकर यांनी केलेले ट्वीट आक्षेपार्ह वाटल्यामुळे सायबर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार केली. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. प्रदीप भालेकर यांनी २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विविध आरोप केले आहेत. तसेच शिंदे व फडणवीस यांनी आपल्याला ठार मारण्याचा कट रचला आहे. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येबाबतही खळबळजनक वक्तव्य ट्वीटमध्ये करण्यात आले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वी देखील राज्यपालांविरोधात बदनामीकारक ट्वीट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने भालेकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देखील आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version