Mumbai-Pune Express way वरील खंडाळा घाटामध्ये ऑईल टँकरला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटामध्ये टँकरला आग लागली आहे. त्यामुळे मागील एक ते दोन तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai-Pune Express way वरील खंडाळा घाटामध्ये ऑईल टँकरला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटामध्ये टँकरला आग लागली आहे. त्यामुळे मागील एक ते दोन तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खंडाळा घाटाच्या ब्रिज खालच्या गाडयांना सुद्धा आग लागली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीमध्ये भक्ष्य झाला आहे. त्यामुळे आग जास्त प्रमाणात भडकल्याने आजूबाजूला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.

ऑईल टँकरला आग लागल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये ऑईल पसरले आहे. या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर एक मृतदेह एक्सप्रेसवेवरच पडल्याचं पाहायला मिळालं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत या घटनेमध्ये काहींचा मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

ऑइल टँकरला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीचा भडका उडाल्याने द्रुतगती महामार्ग आणि त्याखालून जाणारा महामार्ग या दोन्ही महामार्गावर या आगीच्या झळा पोहचत आहेत. त्याचबरोबर जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. केमिकलचा टँकरला खंडाळा घाटात आग लागली असून या घटनेत टँकरचा चालक जागीच ठार झाला असून क्लिनर जखमी झाला आहे.आगीचा लोळ खाली पडून एक महिला जखमी झाली आहे अशा माहिती पोलिस अधिक्षक लता फड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

हे ही वाचा:

Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर

Aditya Thakare यांच्या वाढदिवसानिमीत्तकेलेल्या जीवनदानाबद्दल तुम्हला माहित आहे का? …

Rinku Singh आणि Yashasvi Jaiswal ला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version