spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भोंदू बाबाच्या सल्ल्याने भावाने केला बहिणीची संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न

मोहंनगरमधून एक मृत कॅन्सर ग्रस्त महिलेची संपत्ती स्वतःच्या नावावर करण्याचे षडयंत्र रचल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सात जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे,तर आरोपींमध्ये भोपाळचे प्रसिद्ध मन्नत बाबा उर्फ संजयकुमार सिंग हा असून मृत महिलेचे नाव कुसुम शंभरकर असे आहे. या प्रकणा बाबत प्रियांका शंभरकर यांच्या दत्तक मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली होती . प्रियांका शंभरकर या लहान असतानाच कुसुम शंभरकर यांनी दत्तक घेतले होते. कुसुम शंभरकर या मूळच्या नागपूरच्या रहिवासी असल्यामुळे सर्व मालमत्ता नागपुरात आहे.

प्रियांकाच्या संगोपनाची जबाबदारी कुसुम शंभरकर घेत होत्या. दरम्यान आरोपी मन्नत बाबाशी कुसुम शंभरकरची भोपाळमध्ये ओळख झाली. पूजेच्या निमित्ताने ती बाबाला भेटत असे. २००९मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कुसुम शंभरकर या नागपुरात एका घरात राहत होत्या. कॅन्सरमुळे त्यांना ९ सप्टेंबर २०२१रोजी त्यांना मानकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.

कुसुम शंभरकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी मन्नत बाबाने त्यांच्या घरी पोहोचून प्रियांकाची भेट घेतली. कुसुम यांनी मोहननगर येथील फ्लॅट व नारीचा प्लॉट माझ्या नावावर व बाबादीपसिंग नगर घर येथील मामा देवीदासचा मुलगा धीरज याच्या नावे केला असल्याचे सांगितले. मन्नत बाबाने केलेल्या या दाव्यानंतर प्रियांकाला आपल्याविरोधात काहीतरी मोठे षडयंत्र रचल्याचा संशय आला. चौकशीत त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून समजले की कुसुम यांना १५ सप्टेंबर रोजी संजयकुमार सिंग उर्फ मन्नत बाबा आणि त्याच्या मामाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध अचानक रुग्णालयातून बाहेर काढले होते. कुसुम कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक होते.

१५ सप्टेंबर रोजी रुग्णालयातून बाहेर आणल्यावर दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी मन्नत बाबाला त्याच्या नावावर फ्लॅट आणि प्लॉटचे गिफ्ट डीड केली. त्याच्या मामाच्या कुटुंबियांनी बाबाच्या संगनमताने आरोपी धीरजच्या नावे बाबादीपसिंग नगर येथे एक मजली घराचे मृत्यूपत्र केले होते. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी इतर आरोपींनी मदत केली. यानंतर १६ सप्टेंबर रोजी कॅन्सरग्रस्त कुसुमला आरोपींनी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रियांका आणि शंभरकर कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

यासंदर्भात केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर एनजीओ कृती समिती आणि अॅड. व्ही.व्हगी. महंत यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१व ३४अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा :

वाद जुना पण कारण नवीन : मित्राने केली मित्राची हत्या

हुसंख्य पक्षाच्या खासदारांनी यूकेच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांना दिला होकार

प्रत्येक ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही; केविलवाणा प्रयत्न म्हणायला हवं-किशोरी पेनदेणेकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss