spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बकरी ईदनिमित्त नाशिकच्या ‘या’ मार्गावरुन वाहतूक बंद!

दोन मार्ग या कालावधीत बंद राहतील, तर इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे.नमाज पठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार

आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण एकाच दिवशी आला आहे. इस्लामी संस्कृतीचा सण ईद-उल-अझा अर्थात बकरी ईद (Bakari Eid) हा सण अनेक भागात मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येतात. नाशिक (Nashik) शहरात तसेच नाशिक जिल्ह्यात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच या पार्श्वभूमीवर सामुदायिक नमाज पठणाचा सोहळा व्यवस्थित व्हावा म्हणून नाशिक शहरातील इदगाह मैदान (Shahajahan Eidgah Maidan) येथे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

उद्या (२९ जून) गुरुवार रोजी बकरी ईद असल्यामुळे नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते. यादिवशी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) मोनिका राऊत (Monica Raut) यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दोन मार्ग या कालावधीत बंद राहतील, तर इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे.नमाज पठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार असून बकरी ईद निमित्त गुरुवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने जुन्या नाशिकसह सिडको, सातपूर, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, भगूर आदी उपनगरीय भागांमधील मशिदींमध्ये ही नमाज पठणाचे नियोजन करण्यात आले आहे.

उद्याच्या ईदसाठी नाशिक शहरातील वाहतुकीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे –

  • त्र्यंबक पोलीस चौकी ते मायको सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी जाण्या-येण्यास बंद करण्यात येणार आहे.
  • याबरोबरच गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद राहणार आहे.
  • मोडक सिग्नलपासून त्र्यंबक रस्त्याने जाणारी वाहतूक सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूरनाका सिग्नल ते जुना सिबीएस
  • सिग्नलमार्गे जातील किंवा मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल मायको सर्कलमार्गे जुना सीबीएस सिग्नलमार्गे त्र्यंबककड़े जातील.
  • मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारी वाहतूक ही मायको सर्कलकडून चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी
  • चौकमार्गे इतरत्र जातील किंवा जुना सिटीबी सिग्नल, एचडीएसी सर्कल, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोडमार्गे जातील.

हे ही वाचा : 

नाशिकमध्ये आज घाटमाथा परिसरामध्ये येलो अलर्ट

Hrithik Roshan चा ‘Fighter’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलिज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss