Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Mahatma Gandhi Jayanti निमित्त Raj Thackeray यांनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारले, म्हणाले…

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे. महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारलं आहे. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी महात्मा गांधींजींचे विचार सांगत राज्यातील वाचाळवीरांना टोला लगवला आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट –

राज ठाकरे आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हणाले, आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….’ याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss