नाशिक मधील तलाठी परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस

नाशिक (Nashik) मध्ये अनेक दिवसापासून तलाठी परीक्षेचे पेपर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक मधील तलाठी परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस

नाशिक (Nashik) मध्ये अनेक दिवसापासून तलाठी परीक्षेचे पेपर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरातील एका महाविद्यालयात काल दुपारी तलाठी परीक्षेचा पेपर सुरु असताना एक विद्यार्थिनीकडे इलेक्ट्रॉनिक उपकरण (Electronic equipment) सापडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतरसुद्धा त्या विद्यार्थिनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तिला सोडून देण्यात आले त्यामुळे अनेकांनी आरोप केला आहे.

नाशिक जिह्ल्यातील म्हसरूळमध्ये तलाठी परीक्षेचा पेपर फुटण्याची घटना ताजी असतानाच एक नवीन घटना घडली आहे. मंगळवारी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हे प्रकरण उघडकीस आले आहे. परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीचा पेपर सुरु असताना एका तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असल्याचे उघडकीस आले आहे. पण यावेळी मात्र तिच्यावर कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. त्या विद्यार्थिनींकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सापडल्यामुळे तिला वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. पण तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप बाकीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी व्हावी अशी मागणी विध्यार्थ्यानी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून तलाठी (गट-क) संवर्गातील ४,३४४ पदासाठी भरती होणार आहे. यासाठी राज्यातील ३६ जिह्ल्यामधील परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळील वेबईजी परिक्षा केंद्रात पहिल्या टण्यातील तलाठी भरतीची (Talathi Exam) परीक्षा केंद्राबाहेरून एका मुलाकडून वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब मोबाईलसह सुक्ष्म श्रवणयंत्र ताब्यात घेण्यात आले होते.


परीक्षा सुरु असताना एका विद्यर्थिनींकडे इलेक्ट्रॉनिक डिवाइस सापडले आहे. परीक्षा केंद्रावर काही मिनटं शिल्कक असताना परीक्षकांनी त्या विद्यार्थिनींकडून ते इलेक्ट्रॉनिक डिवाइस काढून घेतले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आले. आणि ती मुलगी परीक्षेसाठी पुन्हा आली नाही. यावेळी त्या मुलीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असा आरोप बाक्कीच्या इतर मुलांनी केला आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे प्रामाणिक विध्यार्थी निराश होत असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version