Osmanabad Suicide Case, एका तरुणीने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत घेतला गळफास

दिवसेंदिवस अनेक दुर्घटना होत आहेत. त्यातच उस्मानाबादमधील (Osmanabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.

Osmanabad Suicide Case, एका तरुणीने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत घेतला गळफास

दिवसेंदिवस अनेक दुर्घटना होत आहेत. त्यातच उस्मानाबादमधील (Osmanabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.विशेष म्हणजे इन्स्टाग्राम’वर (Instagram) लाईव्ह येऊन या तरुणीने घेतला गळफास घेत आपला जीव गमावला.ही सदर घटना उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील अंबिका हॉटेलमध्ये उघडकीस आली आहे. या तरुणीने ‘इन्स्टाग्राम’वर लाईव्ह येत स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यातच आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. यमत उर्फ राणी दोमन हासदा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. .

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा शहरापासून जवळच असलेल्या जकेकूर चौरस्ता भागात अंबिका हे हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झारखंड येथील रायमत उर्फ राणी दोमन हासदा या तरुणीने इन्स्टाग्रामवर (Instagram) लाईव्ह येत स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान ही घटना निदर्शनास येताच हॉटेल चालकाने याची माहिती उमरगा पोलिसांना दिली.त्यानंतर याबाबत माहिती मिळताच अवघ्या काही काळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह अधिक तपासणीसाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात तरुणीचा मृतदेह पाठवला आहे . रात्री उशिरा पोस्ट-मार्टम झाल्यानंतर मृतदेह तरुणीच्या मूळ गावी झारखंडला पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणी मयत तारिणीची मैत्रीण राधिका राजेश कश्यप हिने पोलीस ठाण्यात तक्रार निंदावली असून , अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली आहे. दरम्यान,ही मयत तरुणी परराज्यातील अंबिका हॉटेलवर कशासाठी आली होती? ती कधीपासून राहात होती?आणि तिने आत्महत्या करण्याचे कारण काय ? हे अद्याप समजले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हे ही वाचा:

Mumbai High Court, अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संबंधाबाबत सामाजिक आणि संवैधानिक बदल आवश्यक

World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version