Sunday, July 7, 2024

Latest Posts

आमची लढाई सुरूच, संपलेली नाही, Chhagan Bhujbal यांचा नारा

छगन भुजबळ यांनी म्हटले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिलं पाहिजे.

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस असून छगन भुजबळ यांनी जालना येथील वडीगोद्री या ठिकाणी भेट दिली. सरकारचे  शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले असून त्यांनी सर्वांची चर्चा केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सगेसोयरे हा शब्द नाही यावर सरकार ठाम आहे. आम्ही कुणालाही धमकी दिली नाही. आम्हाला दोन वाघ पुन्हा मैदानात हवे आहेत. लोकसभा निवडणूक पार पडली तरीही निवडणुकीनंतरही ओबीसींच्या घरावर हल्ले झाले. असे म्हणत जमाना जानता हैं, हम किसी के बाप से डरते नहीं, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांनी म्हटले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिलं पाहिजे. लोकशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. असे म्हणत आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला राहू द्या. शरीफ हैं हम, किसी से लढते नहीं, असा नारा छगन भुजबळ यांनी लावला.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss