महागाईचा भडका ! १ लीटर दुधासाठी मोजावे लागणार ८० रुपये

एकीकडे राज्यात गणेशोत्सवाची लगबग आहे आणि त्यातच आता सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागत आहे.

महागाईचा भडका ! १ लीटर दुधासाठी मोजावे लागणार ८० रुपये

एकीकडे राज्यात गणेशोत्सवाची लगबग आहे आणि त्यातच आता सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागत आहे. या सणासुदीच्या दिवसात दूध हे प्रत्येकांसाठीच महत्वाचे असते. त्याच दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे. जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.

दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईत आता सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत. मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागू असतील.

चाऱ्याचा खर्च वाढल्यामुळे हा फटका दूध उत्पादकांना बसत आहे आणि म्हणून ही वाढ करण्यात आली आहे. परिणामी दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये महागाईची झळ सर्व सामान्यांना सोसावी लागणार आहे. दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईत १ तारखेपासून सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे.

हे ही वाचा:

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

जाणून घ्या… हरतालिका उपवासाचे महत्व

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version