spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोल्हापुरात पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उघडझाप केल्यानंतर आज २२ जुलै रोजी शनिवारी पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे.

कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उघडझाप केल्यानंतर आज २२ जुलै रोजी शनिवारी पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्यात गेल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वेगाने होत आहे. त्यामुळे नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी ३६ फुट ४ इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फूट आहे. एकूण ७५ बंधारे पाण्याखाली आहेत.

आज सकाळपर्यंत ६६ बंधारे पाण्याखाली होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सायंकाळी चारपर्यंत आणखी ९ बंधारे पाण्याखाली गेले. बंधारे पाण्याखाली एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून अनेक मार्गावर एसटी बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख २४ राज्यमार्गांपैकी ५ मार्गांवर वाहतूक बंद आहे. जिल्हा मार्ग असलेल्या १२२ पैकी १० मार्ग बंद असल्याने एकूण १५ मार्गांवर वाहतूक बंद आहे.

दरम्यान, राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणात आता ७३.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर कासारी, कडवी आणि कुंभी धरणातही ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणातही ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत आहे. धरणात ९.३१ टीएमसी पाणीसाठा झाला असून ३६.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे.संभाजीनगर आगारातून रंकाळा ते चौके, रंकाळा ते वाशी आणि रंकाळा ते वाशी या मार्गावर गोट पुलावर पाणी आल्याने एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गडहिंग्लज आगारातून भंडारा, तावरवाडी, ऐनापूरकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. चंदगड आगारातून हेरे, इब्राहिमपूर, पारगडकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद आहे. आजरा आगारातून चंदगड, साळगाव, आजरा-चंदगड मार्गावरील गवसे पुलावर पाणी आल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे.

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी
घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज
वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची
कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे,
धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
तुळशी नदी : बीड
ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड
दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली

हे ही वाचा:

आशुतोष गोवारीकर करणार ओटीटीवर पदार्पण

कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss